Devendra Fadnavis | राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. निवडणुका आता तोंडावर आल्याने सर्वत्र प्रचारसभा रंगताना दिसून येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांची धुळ्यात जाहीर सभा सध्या सुरू आहे. पहिल्याच सभेत त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. याच सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठा शब्द दिला आहे. (Devendra Fadnavis)
“तुमच्या आशिर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याशिवाय MSP पेक्षा भाव कमी झाल्यास भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील”,असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
“शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय आम्ही घेतलाय”
“मोदींच्या नेतृत्वाखाली मनमाड-इंदूर रेल्वेसेवेच्या माध्यमातून एक अशा प्रकारचं सेंटर धुळ्यात तयार होतेय. मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर, धुळे-मनमाड रेल्वे या सगळ्याचा एकत्रित विचार केला, तर इंडस्ट्रीज लॉजिस्टिक सेंटर कुठलं असेल, तर धुळे जिल्हा असेल. मोदींनी सहा राष्ट्रीय महामार्ग धुळ्याला दिले”, असंही फडणवीस म्हणाले.
“धुळे जिल्हा 100 टक्के रिझल्ट देणार. पाचही जागा महायुतीच्या निवडून येणार. मुलींना मोफत शिक्षण, मोदींच्या नेतृत्वाखाली लखपती दीदी या योजना राज्यात सुरू आहेत. शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात 8 हजार रुपये पीक विम्याची योजना सुरु आहे. शेतकऱ्यांना वीज बिल माफ करुन सरकारने शेतकऱ्यांची वीज बिलातून मुक्ती केली. पुढच्या पाचवर्षांसाठी वीज बिलातून मुक्ती सरकारने दिलीय.”, असं सभेत फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं.
वोट जिहादवर फडणवीस यांचं मोठं भाष्य
पुढे त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला. “आम्ही सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन महाराष्ट्र पुढे नेतोय. आमच्या विकासाला उत्तर देता येत नाही, म्हणून आमच्या विरोधकांनी रणनिती आखली आहे. धुळ्यात ते वोट जिहाद करतायत. लोकसभेला मालेगाव सेंट्रल आणि धुळ्यातील वोट जिहादमुळे चार हजार मतांनी पराभव झाला.आता जागे झालो नाही, तर नेहमीसाठी झोपावं लागेल.”, असं म्हणत फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वोट जिहादबाबत मोठं भाष्य केलं.
News Title : Devendra Fadnavis big announcement for farmers
महत्वाच्या बातम्या –
‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “नको त्या गोष्टी माझ्या तोंडी..”
‘अटक होऊ शकते म्हणून अजित पवारांनाही घाम फुटला होता’; खळबळजनक दावा समोर
मुख्यमंत्र्यांचं शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं: शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची टीका
आजपासून राज्यात पंतप्रधानांच्या कधी व कुठे सभा? पाहा संपूर्ण वेळापत्रक