Devendra Fadnavis | बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली. याचे पडसाद विधानसभेतही उमटले. आज (20 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी विधानसभेत अल्पकालीन चर्चेवर उत्तर दिलं. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा(Mocca) लावण्यात येणार असल्याचे आज फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. तसेच, बीडच्या पोलीस अधिक्षकांची बदली करण्याचे देखील त्यांनी आदेश दिल्याची माहिती दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
बीडमध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली इथंपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. तर, त्याची सर्व पाळंमुळं खोदावी लागतील. अवाडा एनर्जी यांनी पवनऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक केलीये. यातून काही लोकांना रोजगार मिळतोय. काही काम आम्हालाच द्या नाही तर खंडणी द्या, अशा मानसिकतेत काही लोक इथे वावरत असल्याचं दिसून आलंय. याच संबंधी 6 डिसेंबरला अवाडा एनर्जीचे ऑफिस आहे तिथे अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे आरोपी गेले होते.यात त्यांनी वॉचमनला शिवीगाळ आणि मारहाण केली.
मारहाण झाल्यामुळे पीडितांनी सरपंचांना कॉल केला. बाजुच्या गावातील आरोपी मारहाण करत असल्याने सरपंच आले.दादागिरी करत असल्याने सरपंचांच्या लोकांनी चोप दिला, त्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय. 9 डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात होते. ते एकटेच होते. तेव्हा पेट्रोल पंपावर त्यांना त्यांचे आतेभाऊ भेटले आणि त्यांना सोबत घेऊन ते पुढे निघाले. (Devendra Fadnavis )
“…चा विचार न करता कारवाई केली जाईल”
पुढे टोल नाक्यावर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व एक गाडी त्यांची वाट बघत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले, स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली. गाडीतून उतरवत मारहाण केली. ते मृत झाल्यावर हे सर्व लोक पळाले, असा सगळा घटनाक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी सभागृहात सांगितला.
पुढे फडणवीस म्हणाले की, सोनावणे यांनी ज्यावेळी फिर्याद दिली, तेव्हा अॅट्रॉसिटी लागू केली. सुनिल शिंदे हे आवाडा येथे हजर असताना चाटे यांच्या कॉलवरून वाल्मिक कराड याने धमकी दिली. धमकीचा गुन्हा आधी घडलाय, त्यानंतर दुसरा गुन्हा घडला आहे. या दोन्ही गुन्ह्याचा संबंध तपासला जात आहे. वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल, असं फडणवीस म्हणाले.
News Title – Devendra Fadnavis big announcement on Santosh Deshmukh murder
महत्त्वाच्या बातम्या-
CNG चा स्फोट अन् ‘इतके’ जण जीवंत जळाले, कुठे घडला हा भयंकर अपघात?
भाजपा म्हणजे नटरंगी नार, ‘या’ नेत्याची जहरी टीका
गुड न्यूज! आठवड्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर
“संजय राठोडांचा काळा डाग शिंदेंच्या कपाळी”; नव्या बॅनरची जोरदार चर्चा
महागाईचा झटका बसणार? ‘या’ वस्तू महागणार