Devendra Fadnavis | लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीने 30 जागा काबिज केल्या आहेत. त्यात भाजपला 10 जागाही मिळवता आल्या नाहीत. महाराष्ट्रातील पराभव हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं राजकीय वर्तुळात म्हटलं जातंय.
निकाल लागल्यानंतर फडणवीस यांनी या अपयशाला आपण कारणीभूत असल्याचं सांगत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यांच्या या निर्णयानंतर भाजप नेत्यांना मोठा धक्का बसला. फडणवीस यांच्या या निर्णयानंतर मविआ नेत्यांकडून त्यांना डिवचण्यात आलं.
मात्र, आज (8 जून) फडणवीस यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पराभवाची कारणे सांगितले. विजयाचे अनेक बाप असतात पण पराभवाचे नाही. पराभवाची जबाबदारी स्वीकारता आली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देशातील लोकांनी मोदींवर विश्वास दाखवला. 2014 आणि 2019 मध्ये आपला सिंहाचा वाटा होता. पण यंदा आपण तसं करु शकलो नाही. नव्याने आपल्याला रणनीती आखता यावी यासाठी आजची बैठक महत्त्वाची आहे. महाराष्ट्रात जे यश मिळालं नाही त्याची कारणं शोधून ती दूर करता येतील. असं फडणवीस (Devendra Fadnavis)म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, “आता नव्याने पेरण्याची वेळ आली आहे. यशाचे बाप अनेक असतात पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असते. नवीन निर्धार करायचा असतो. मी या अपयशाची जबाबदारी घेतली. देवेंद्र फडणवीस पळणारा व्यक्ती नाही. आमची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे. कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो तर ते सत्य नाही. मी अमित शाहांना भेटून आलो आहे. त्यांना मी माझी भूमिका सांगितली. त्यांनी सांगितलं आपण महाराष्ट्राची ब्लूप्रिंट तयार करु. मी एक मिनीट देखील शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये’, असं म्हणत एकप्रकारे फडणवीस यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे.
“..पेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या”
“देशात ज्या प्रकारे मोदींजींना समर्थन दिलं. ओडिसामध्ये आपलं सरकार आलं. आंध्रप्रदेशमध्ये एनडीएचं सरकार आलं. अरुणाचल मध्ये आपलं सरकार आलं. मोदी म्हणाले की, त्यांना तीन निवडणूका मिळून जितक्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या. इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या तेवढ्या एकट्या भाजपला मिळाल्या.”, असंही यावेळी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं.
News Title- Devendra Fadnavis big statement
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! बच्चू कडू यांचा महायुतीला धक्का, घेतला सर्वात मोठा निर्णय
‘अॅनिमल’ फेम तृप्ती डीमरीने मुंबईत घेतलं आलिशान घर; किंमत कोटींच्या घरात
“वसंत दादांचा नातू निवडून आलाय, त्यामुळे ठाकरेंची..”; विशाल पाटलांचं वक्तव्य चर्चेत
सरकार स्थापनेपूर्वीच सराफा बाजारात तेजी; सोनं महागलं, आता किंमती काय?
“सुजल्यावरच कळतंय..”; शरद पवार गटाने बॅनरद्वारे अजित पवारांना डिवचलं