बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीतील आमदारांबाबत देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

मुंबई | राज्यसभा (Rajyasabha) निवडणुकीत सहाव्या जागेसाठी भाजपचा उमेदवार विजयी झाल्याने भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. हा विजय साजरा करण्यासाठी भाजपचे अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. कार्यक्रम झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadvanis) यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

तुम्ही तुमचा कोणताही उमेदवार मागे घेऊ नका. आम्ही खूप सोशिक आहोत असं आम्हाला सरकार दाखवायचं आहे. अशी विंनती सरकारामधील काही लोकांनी आम्हाला केली होती, असा खळबळजनक दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केल्याची माहिती आहे.

मला वाटत मविआ मधील काही नेते नाराज आहेत. त्यांना ग्राह्य धरलं जात आहे. त्यांचा मनात असंतोष आहे. त्यामुळे आम्ही त्यांना मदत केली. सरकारमधल्या मतभेदाचा फायदा आम्हाला झाला. त्याचे उमेदवार विजयी झाले. त्यांचंही आम्ही अभिनंदन करतो, असंही ते म्हणाले.

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी केली आहे. 20 जूनला विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार आम्ही लवकरच जाहीर करु, असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय.

थोडक्यात बातम्या-

राज्यात पुढील पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

“उद्धव ठाकरे यांनी स्वत: पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाही”

‘अब देवेंद्र अकेले ही नहीं, सारी कायनात उनके साथ है’- अमृता फडणवीस

“आमचे 106 त्यांच्या 170 वर भारी; तुमची झोप उडविण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुरेसे आहेत”

“अनाजी पंतांना महाराष्ट्र स्वीकारणार नाही; एका राज्यसभेने पुन्हा मुख्यमंत्री बनता येत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More