‘महाविकास आघाडी सरकार पडलं की…’; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
मुंबई | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काल स्पष्ट झाले (Assembly Election Result 2022). पाच पैकी चार राज्यात भाजपचा बोलबाला पाहायला मिळाला. उत्तर प्रदेश आणि गोव्यातील भाजपच्या (BJP) विजयानंतर महाराष्ट्रातही राजकारण रंगायला सुरूवात झाली आहे.
गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गोव्यातील विजयाचे शिल्पकार ठरले. गोव्यातील विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील सत्तांतराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
आम्ही 2024च्या निवडणुकीची तयारी सुरू केली असून राज्यात भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तर महाराष्ट्रात भाजप सरकार पाडणार नाही पण ते अंतर्विरोधामुळे पडले तर भाजप पर्यायी सरकार देईल, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
दरम्यान,उत्तर प्रदेश तो झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, अशा घोषणा उघडपणे भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहेत. त्यात भाजपच्या चार राज्यातील विजयानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता असल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात रंगत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाला कोणतं वळण येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“आम्ही आणखी लढू, कधी ना कधी यश येईल”
ऐतिहासिक विजयानंतर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
पाच राज्यातील निकालानंतर भाजपची मोठी घोषणा! आता मुंबई…
2022 मधील निकालांनी 2024 मधील भविष्य निश्चित केलंय – पंतप्रधान नरेंद्र मोदी
पाच राज्यातील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
Comments are closed.