“मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो”

मुंबई | मी पुन्हा येईल ही सिंगल लाईन कधीच नव्हती. मी पुन्हा येईल याबद्दल बऱ्याच गोष्टी होत्या. मी काय करेल हे सगळ सविस्तर सांगितल होतं. मी पुन्हा येईल, तर मी आलोच. जरासा वेळ लागला पण मी आलो तर दोन्ही पक्ष फोडूनच आलो, असं वक्तव्य राज्याचे उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलंय.

“मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण”

राहुल गांधी (Rahul Gandhi) मुंबईत सभा घेत असताना काँग्रेस न होती तो क्या होता या पुस्तकाचे आज प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आयोजित करण्यात आली. यावेळी फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

लोकांनी आम्हाला निवडून दिलं पण, उद्धवजी (Uddhav Thackeray) यांनी स्वार्थासाठी पाठीत खंजीर खुपसला. आम्ही पुन्हा आलो तेव्हा कौतुक झालं. नव्हतो आलो तेव्हा टीका झाली, हे होत राहतं. पुन्हा यायला अडीच वर्षे लागली पण, जेव्हा आलो तेव्हा दोन पक्ष तोडून आलो, असं फडणवीस म्हणालेत.

“सत्तेतून पैसा, पैशातून ताकद आणि त्यातून सत्ता”

सत्तेतून पैसा, पैशातून ताकद आणि त्यातून सत्ता असं राजकारण सुरू होतं. सुरुवातीच्या काळातील राज्यातील राजकारण पाहिलं तर, 50 परिवार आहेत ज्यांच्या भोवती हे राजकारण फिरत राहिलं. काही परिवार असे होते की ज्यांनी समाजकार्य सुद्धा केलं. पण, काहींनी नाही. बाहुबली, गुन्हेगार यांची गरज भासू लागली आणि मग या सर्वांचा प्रवेश होऊ लागला, असं फडणवीसांनी म्हटलंय.

गुंडांच्या व्यतिरिक्त राजकारण होऊ शकतं हे आम्ही मागच्या 10 वर्षात दाखवलं आहे. 100 टक्के यश मिळालं असं नाही. पण, काम सुरु आहे. आणखी पुढे जायचं आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.

आम्ही शिवरायांना मानणारे लोक आहोत. शिवरायांचा राज्याभिषेक झाला तेव्हापासून एकदाही गादीची मजा घेतली नाही. त्यांनी राज्याभिषेक फक्त यासाठी केला की, जगाला कळावे की, आम्ही गुलामीतून बाहेर आलोय. मोदीजी सुद्धा हेच म्हणाले की, आम्हाला सुद्धा विश्वास आहे की, आम्ही तिसऱ्यांदा निवडून येऊ, असं फडणवीसांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! निवडणुकीसाठी उमेदवाराला ‘इतके’ लाख रूपये खर्च करता येणार

‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांना लागली लॉटरी; डबल फायदा

कारमधून आले, पिस्तूल काढलं नंतर जे घडलं त्याने पुणे हादरलं!

मनोज जरांगेंना मोठा धक्का; अडचणीत आणखी वाढ

58 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म, फोटो समोर