देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या पराभूत उमेदवारांना दिल्या ‘या’ महत्वपूर्ण सूचना

Badlapur

Devendra Fadnavis l यंदाचं वर्ष राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचं आहे. कारण हे वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. अगदी काही काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने बाजी मारली आहे तर भाजप पक्षाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपाला या निवडणुकीत हवे तसे यश मिळू शकले नाहीत.

महाराष्ट्रात भाजपकडून पराभवाचा घेतला जातोय आढावा :

लोकसभा निवडणुकीत भाजपला निराशा पत्करावी लागली आहे. मात्र आता या निराशाजनक कामगिरीचे संघटनेकडून गांभीर्याने मूल्यमापन केले जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजप उमेदवारांची भेट घेतली आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पराभूत उमेदवारांशी चर्चा केल्यानंतर त्यांना नव्या ताकदीने कामाला लागण्याचे आदेश देखील दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपने तब्बल 28 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यापैकी अवघ्या 9 जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. मात्र अशातच 2019 च्या तुलनेत भाजपच्या खासदारांची संख्या 23 वरुन अवघ्या 9 पर्यंत खाली घसरली होती. या निराशाजनक कामगिरीनंतर महाराष्ट्रात भाजपकडून पराभव नेमका कोणत्या गोष्टींमुळे झाला याचा आढावा घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजपच्या पराभूत उमेदवारांशी संवाद साधून अपयशयाची कारणे जाणून घेतली आहेत.

Devendra Fadnavis l विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीसांनी पराभूत उमेदवारांना दिला कानमंत्र :

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या लोकसभेतील पराभूत उमेदवारांना नव्या उमेदीने कामाला लागण्याचा कानमंत्र दिला आहे. कारण पराभवाने खचून न जाता आता विधानसभेसाठी सर्वांनी ताकदीने कामाला लागू असे त्यांनी सांगितले आहे.

विधानसभेसाठी सर्वांनी स्वतःला झोकून देऊन काम करा अशी सूचना देखील देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना केली आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका विधानसभेत होणार नाहीत यासाठी आत्तापासूनच तयारीला लागा, असे देवेंद्र फडणवीस यांनी पराभूत उमेदवारांना सांगितले आहे.

News Title – Devendra Fadnavis BJP Loksabha Candidate Meeting

महत्त्वाच्या बातम्या-

लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली; तात्काळ रुग्णालयात केलं दाखल

या राशीच्या व्यक्तींना उत्पन्नाची नवीन संधी मिळेल!

दिल्लीत निलेश लंकेंनी घेतली नितीन गडकरींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

आशिया कपचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार भारत vs पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना

“शिंदे-फडणवीसांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय, राज्यातले उद्योग गुजरातला पळवले”

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .