शपथविधीपूर्वी फडणवीसांचा शरद पवारांना फोन, चर्चेला उधाण

Devendra Fadnavis | महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज मुंबईतील आझाद मैदानावर पार पडत आहे. या सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. पीएम मोदींसह राजकारणातील दिग्गज नेत्यांची या सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे. महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. मात्र, या सोहळ्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी शरद पवारांना फोन केल्याने राजकारणात चर्चेला उधाण आलंय.

शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू असताना फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन का केला असावा, त्यामागे काय कारण असेल, याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. पण, यामागे कोणतंही राजकीय कारण नसून फडणवीस यांनी शरद पवार यांना सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यासाठी फोन केल्याची माहिती आहे.

फडणवीस यांचा शरद पवारांना फोन-

मात्र, शरद पवार आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवार शपथविधीला उपस्थित राहू शकत नाहीत, असं त्यांनी कळवलं आहे. माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील फडणवीस यांनी स्वतः फोन करून सोहळ्यासाठी निमंत्रण दिल्याची माहिती आहे.

भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी शपथ विधी सोहळ्याला उपस्थित रहावं, यासाठी त्यांना निमंत्रित करून विनंती केल्याची माहिती दिली. आता उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या सोहळ्याला हजेरी लावणार का, याकडे सर्वांचं लक्ष राहील. (Devendra Fadnavis )

दरम्यान, आज सायंकाळी आझाद मैदानावर महायुतीचा शपथविधी होणार आहे. यासाठी अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती असणार आहे. तसेच, आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी होणार असल्याचं देखील समोर आलंय. त्यामुळे या सोहळ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

News Title –  Devendra Fadnavis Called To Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या : 

मोठी बातमी! गृहखात्याच्या बदल्यात शिवसेनेला ‘हे’ महत्त्वाचं खातं मिळणार

‘मैं समंदर हूं, लौटकर आऊंगा…’, तरुण महापौर ते मुख्यमंत्री; फडणवीसांचा थक्क करणारा प्रवास

एकनाथ शिंदेंचं ठरलं! मोठा निर्णय घेतला

“शिंदेंमध्ये दिल्लीसोबत पंगा घ्यायची हिंमत नाही, त्यामुळे…”; संजय राऊतांनी डिवचलं

अखेर फडणवीसांच्या मनधरणीला यश, एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ!