मुंबई | भाजप नेत्या व केंद्रीय मंंत्री स्मृती ईराणी (Smriti Irani) यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान चांगलाच राडा पाहायला मिळाला. काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) स्मृती ईराणींविरोधात पुण्यात जोरदार आंदोलन छेडल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं.
या आंदोलनादरम्यान स्मृती ईराणींच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांनी तीव्र संताप व्यक्त केला असून थेट पोलिसांनाच इशारा दिला आहे.
स्मृती ईराणींवर अशाप्रकारे केलेला हल्ला भ्याड आहे. आम्ही देखील त्याला जशास तसे उत्तर देऊ शकतो. पण आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत. आम्ही पोलिसांना संधी देत आहोत. मात्र, पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही तर आम्हालाही जशास तसे उत्तर द्यावे लागेल हे देखील पोलिसांना चेतावतो, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
दरम्यान, रोज कायदा हातात घेतायत आणि बेकायदेशीर कृत्य करतायत. महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते असं कृत्य करू लागले तर महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था नाही हे स्पष्ट दिसेल, असा टोला देखील फडणवीसांनी लगावला आहे.
थोडक्यात बातम्या-
धक्कादायक! प्लास्टिक सर्जरी जीवावर बेतली, सर्जरी दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू
‘सभा करायच्याच असतील तर…’; दीपाली सय्यद यांचं राज ठाकरेंना आव्हान
‘रोहित बाबा…’; रोहित पवारांच्या टीकेवर चंद्रकांत पाटलांचा पलटवार
“…तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावू”
राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेबाबत वळसे-पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Comments are closed.