Top News

आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु आहे- देवेंद्र फडणवीस

मुंबई | आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु आहे. त्यातूनच या बदल्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलीच गेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या बदल्या थांबवल्याचं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या मुद्दयावरून तयार झालेल्या स्थितीवरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मला वाटतं या प्रकरणात समन्वयाचा अभाव तर आहेच, मात्र, एक प्रकारचा अविश्वास देखील आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील असतात म्हणूनच ते मंत्री असतात. मात्र, आता जी परिस्थिती दिसते त्यावरुन गोंधळच असल्याचं दिसत आहे. या साथीच्या रोगाच्या स्थितीत गोंधळ योग्य नाही. अधिक समन्वय ठेवावा आणि विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असंही फडणवीस यांनी नमूद केलं.

दरम्यान, ज्याला जे वाटेल ते ते करतात. कधी अधिकारी निर्णय घोषित करतात, कधी मंत्री तर कधी मुख्यमंत्री निर्णय घोषित करत आहेत. सामान्यपणे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. त्यांनी मंत्र्यांना विश्वासात घेत निर्णय घ्यायचे असतात, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेना-राष्ट्रवादीत फोडाफोडीचं राजकारण; पारनेरमध्ये शिवसेनेला, कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका!

स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण

महत्वाच्या बातम्या-

अजित पवारांच्या सूचनेनंतर पुण्याचे विभागीय आयुक्त ‘इन अ‌ॅक्शन मोड!’

हे सरकार नाही तर सर्कस आहे, नितेश राणेंचा महाविकास आघाडीवर टीकेचा बाण

मास्क घातला नाही तर 10 हजार रूपये दंड, ‘या’ राज्य सरकारने घेतला निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या