बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीनं दुचाकीस्वारास उडवलं, तीन जण जखमी

नांदेड | गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करायला गेले आहेत. या दौऱ्यात फडणवीस पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीची पाहणी कऱणार आहे. नुकतच ते नांदेड दौऱ्यावर गेले असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनानं दुचाकीस्वारास उडवल्याची घटना समोर येत आहे.

नांदेड येथील गडगा ते मुखेड मार्गावर ही घटना घडल्याचं समोर येत आहे. देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीनं झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. सुदैवानं या अपघातात कोणाचाही जीव गेला नाही.

फडणवीसांच्या दौऱ्यासाठी मुंबईवरुन आलेले पत्रकार त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होते. पाठलाग करत असताना छत्रपती अकॅडमी जवळ या गाडीनं दुचाकीस्वारांना धडक मारली. या अपघातात पोलीस कर्मचारी नामदेव दोसलवार, बालाजी पवार, राजेश जाधव हे तिघेजण जखमी झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं.

दरम्यान, गेल्या आठवड्याभरात मुसळधार पावसानं शेतकऱ्याच्या पीकाचं नुकसानं झालेलं पहायला मिळालं. मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळं शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर जात या परिस्थितीचा आढावा घेतला.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! शिवसेना कार्यकर्त्यांनी केली युवासेना पदाधिकाऱ्याला मारहाण

ड्रग्स प्रकरणात आर्यन खानसह ‘या’ सात जणांना तुरूंगाची हवा!

आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात खराब बॉल, धोनीही झाला थक्क, पाहा व्हिडीओ

दिलासादायक! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More