बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन!

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काकी शोभा फडणवीस यांना पुत्रशोक झाला आहे. अभिजीत माधवराव फडणवीस हे जगदंबा राईस मिलचे भागीदार होते.

देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजीत फडणवीस यांचं बुधवारी सकाळी ह्दयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. ते 54 वर्षाचे होते. नागपुरातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेते उपस्थित असतील.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे ते एकुलते एक सुपुत्र, तर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू होते. त्यांच्या पश्चात मातोश्री, पत्नी, पुत्र तन्मय फडणवीस असा परिवार आहे.

दरम्यान,माधवराव फडणवीस यांना नागपूरातील राहत्या घरी ह्दयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीनं उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं मात्र तोवर अभिजीत फडणवीस यांची प्राणज्योत मालवली होती.

थोडक्यात बातम्या- 

“शरजील उस्मानीला आणला का शोधून पाताळातुन?”

राणेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक, उद्धव ठाकरेंचं ते वक्तव्य शोधलं, राडा होणार!

“सत्तर वर्षांची कमाई मोदींनी विकून टाकली”, पाहा राहूल गांधींचा व्हिडीओ

नितेश राणे पेटून उठलेत?, मध्यरात्री केलं हे ‘करारा जवाब’ देणारं ट्विट

गाढवाची गोष्ट सांगत अर्जुन खोतकरांची राणेंवर टीका, पाहा व्हिडीओ 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More