बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बावनकुळेंचा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक”

नागपूर | भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी नागपूर विधान परिषद निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं. नागपूरमध्ये बावनकुळे यांचा एकतर्फी विजय झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘मी स्वत: निवडून आलो त्यापेक्षा जास्त आनंद मला आज बावनकुळेंच्या विजयाने झाला आहे. बावनकुळेंचा विजय हा भविष्यातील विजयाची नांदी आहे’, असं म्हणत फडणवीसांनी आनंद व्यक्त केला आहे. तर बावनकुळेंचा विजय म्हणजे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) चपराक आहे, अशी खोचक टीकाही फडणवीसांनी केली आहे.

नागपूर पाठोपाठ अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातही भाजपनं विजयी झेंडा फडकवला आहे. भाजपचे हे दोन्ही विजय महाविकास आघाडीसाठी मोठे धक्के असल्याचं समजलं जात आहे. (MLC Election Result 2021)

दरम्यान, नागपूरमध्ये भाजपचा (BJP) एकतर्फी विजय झाला तर अकोल्यात भाजपनं आपली मते तर राखलीच शिवाय महाविकास आघाडीची 96 मते फोडली असल्याचंही समोर आलं आहे. भाजपच्या या विजयानंतर महाविकास आघाडीला दुहेरी धक्का बसला आहे.

थोडक्यात बातम्या-

MLC Election Result | “नाना पटोले यांच्या हुकूमशाहीला जनतेनं जागा दाखवली”

“अंतर्गत वादामुळे काँग्रेसचा पराभव, पटोलेंनी राजीनामा द्यावा”

अकोला विधान परिषद निवडणूक: अकोल्यातही भाजपचा झेंडा, महाविकास आघाडीला मोठा धक्का

‘मी दिल्लीतच आहे, माझ्यावर कारवाई करा’; संजय राऊत यांचं खुलं आव्हान

नागपूर विधान परिषद निवडणूक: भाजपचा काॅंग्रेसवर दणदणीत विजय, बावनकुळे पुन्हा आमदार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More