“देवेंद्र आहेत ते, तळपती तलवार, भ्रष्टाचाऱ्यांनो आता लवकरच…”
मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी विधानसभेत महाविकास आघाडीवर आरोपांच्या फैरी झाडल्या. देवेंद्र फडणवीसांनी पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत विधानसभा हदरवून सोडली. देवेंद्र फडणवीसांनी काही पुरावे सादर करत राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 125 तासांच्या स्टिंगमधील काही महत्त्वाचे भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हमधून सादर केले. सरकारी वकील प्रवीण चव्हाण (Pravin Chavhan) यांच्या माध्यमातून अनेक महानायक खेळ खेळत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. अनेक नेते भाजपमधील नेत्यांना संपवण्याचा कट करत असल्याचा गंभीर आरोपही फडणवीसांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकल्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी ट्विट करत महाविकास आघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे. देवेंद्र आहेत ते, तळपती तलवार आहेत. भ्रष्टाचाऱ्यांनो तुमचा लवकरच बाजार उठवणार आहेत, असा इशारा अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून विधानसभेत खळबळजनक आरोप केले. फडणवीसांनी पुरावे सादर करत अनेक गंभीर आरोप केले. या आरोपांवरून राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे.
देवेंद्र आहेत ते
तळपती तलवार आहेत
भ्रष्टाचाऱ्यांनो तुमचा लवकरच
बाजार उठवणार आहेत…— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 9, 2022
थोडक्यात बातम्या-
विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आणि गाराही पडणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
मोठी बातमी! रशियाची ‘ही’ अट युक्रेनला मान्य
…तर योगी आदित्यनाथ इतिहास रचतील, अनेक विक्रम मोडतील
“म्हणजे आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का?”
“आमचे मित्र फडणवीस नटसम्राट आहेत, सत्यता तपासावी लागेल”
Comments are closed.