बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विरोधी पक्षातील नेत्याने आवाज उठवला तर चार दिवसांनी त्याचं प्रेत आढळतं”

नवी दिल्ली | गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर देशातील राजकारण तापताना दिसत आहे. आज आमदारकीचा राजीनामा दिलेले रोहन खंवटे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“विरोधी पक्षातील नेत्याने सत्ताधाऱ्यांना एखादा प्रश्न विचारला, विषय मांडला अथवा आवज उठवला तर चार दिवसांनी त्याचं प्रेत आढळतं. अशा प्रकारची तानाशाही बंगालमध्ये आढळते”, असा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

‘पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी आहे, अत्याचार आहेत. एकही कारखानदार तिथे जात नाही.सर्वाधिक बेरोजगारी बंगालमध्ये आहे याचं उत्तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) देतील का?’, असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, ‘ज्यांच्याकडे स्वत:च्या राज्यासाठी कोणतेही निश्चित कार्यक्रम नाही ते गोवा राज्यात काय करणार. हे पक्ष निवडणुक आली की येतात, आपापले एक्सपिरीमेंट करतात आणि जनतेने नाकारलं की पुन्हा मार्गस्थ होतात’, असं म्हणत फडणवीसांनी तृणमुल काँग्रेस (TMC), आम आदमी पार्टी (AAP) आणि काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! ‘या’ देशानं 11 दिवसांसाठी घातली हसण्यावर बंदी

‘बलात्काराचा आनंद घ्या’; म्हणणाऱ्या काॅंग्रेस नेत्यानं मागितली जाहीर माफी

“निवडणुका आणि राजकारण हा तर खेळ, तो काळजीपूर्वक खेळला पाहिजे”

हात न लावता शेण उचलण्यासाठी शेतकऱ्याचा देसी जुगाड, पाहा व्हिडीओ

सचिन तेंडुकरची BCCI एन्ट्री?; सौरव गांगुली म्हणतो…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More