बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल”

मुंबई | देशातील 33 टक्के रुग्ण ज्या राज्यात आहे. ज्या राज्यातील मृत्यू जास्त आहेत. त्या राज्यातील मंत्री स्वत:ची पाठ थोपटतात, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला चोख प्रत्युत्तर दिलं. सरकारच्या फेकाफेकीचा पर्दाफाश आम्हाला करावाच लागेल, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला आहे.

महाराष्ट्र सरकारकडून पीपीई किट्स मिळाल्या नाहीत, असं सांगितलं गेलं. मात्र केंद्र सरकारकडे कोणत्या राज्याला किती पीपीई किट्स दिल्या याचं डायनॅमिक डॅशबोर्ड आहे. त्यावर सविस्तर माहती असते. 26 मे पर्यंत महाराष्ट्राला 9 लाख 88 हजार म्हणजेच जवळपास 10 लाख पीपीई किट्स देण्यात आल्या आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

आम्ही विकत घेतो, हे सांगत असताना अनिल परब विसरले की पीपीई किट्स आणि N 95 मास्क खरेदीसाठी 468 कोटी केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये टेस्ट अधिक होत आहे, त्यामुळे रुग्णांची संख्या अधिक आहे, असं सांगण्यातच आलं. हे पूर्णपणे खोटं आहे, असं फडणवीसांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात 13 ते साडे 13 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. मे महिन्यात तर मुंबईत टेस्ट घेणाऱ्यांपैकी 35 टक्के नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मग कशाचा आधारावर हे सरकार स्वत:ची पाठ थोपवून घेत आहे? हे मला खरोखर समजत नाही, असा सवाल फडणवीस यांनी केला.

ट्रेंडिंग बातम्या-

फडणवीसजी, महाराष्ट्रापेक्षा गुजरातची अवस्था बिकट आहे- जयंत पाटील

…म्हणून रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुलट सोडल्या- अनिल परब

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट; आज आढळले इतके रुग्ण

“एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण, करुन दाखवा रडून नको”

मराठी युवकांकडे कौशल्य नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना जयंत पाटलांचं सडेतोड प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More