महाराष्ट्र मुंबई

राजू शेट्टी सरकारी आंदोलक, त्यांची लुटूपुटूची लढाई सरकार वाचवण्यासाठी- देवेंद्र फडणवीस

मुंबई | राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक आहेत. त्याची लुटूपुटूची लढाई केवळ सरकार वाचवण्यासाठी आहे, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर केला आहे.

या अडचणीच्या काळात दूध उत्पादक शेतकरी हा दुधाच्या उत्पन्नावर जगतो आहे. ज्यावेळी दुधाचे दर कमी होतात त्यावेळी दर स्थिर करण्यासाठी सरकार अनुदान देतं. सध्या शेतकऱ्यांच्या दुधाला मिळणाऱ्या दरात गाईच्या चाऱ्याचा खर्चही निघत नाही. असं असतानाही सरकारकडून कुठलेही अनुदान मिळत नाही हे दुर्दैवी आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राजू शेट्टी लुटूपुटूची लढाई करत आहेत. ते सरकारमध्ये आहेत. त्यामुळे ही फक्त सरकार वाचवण्यासाठीची लढाई आहे. राजू शेट्टी सरकारी आंदोलक झाले आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राजू शेट्टीवर टीकास्त्र सोडलंय.

देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब थोरात याचे दावेही फेटाळले. बाळासाहेब थोरात यांची माहिती चुकीची आहे. देशात एक ग्रामही दुधाची भुकटी आयात झालेली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या-

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

मटका किंग मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याची त्याच्याच ऑफिससमोर गोळ्या घालून हत्याॉ

‘साहेब झोपूनच असायचे रिया मॅडम मात्र…’ सुशांतच्या बाॅडिगार्डचे धक्कादायक खुलासे

आत्महत्येच्या रात्री नक्की काय घडलं?; सुशांतच्या मित्राने केला खुलासा

‘सुशांत संशयास्पद औषधं घेत होता’, जीम ट्रेनरचा धक्कादायक खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या