बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भास्कर जाधवांनी विधानसभा अध्यक्ष व्हावे पण…; देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेलं नाव म्हणजेच भास्कर जाधव. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळी भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करून चर्चेत आलेले भास्कर जाधव यांच्यावर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. भास्कर जाधव यांनी नुकतीच विधानसभा अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष झाल्यास आनंदच होईल असे मत माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं होतं. दरम्यान, यावरूनच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांना टोला लगावला आहे. भास्कर जाधव यांनी खुशाल विधानसभा अध्यक्ष व्हावे. मात्र त्यांनी निदान निष्पक्ष काम करावं, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष निवडीवरून महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून सडकून टीका होताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, महाविकास आघाडी सरकारमध्ये एकमत राहिलेलं नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कधी निवडला जाणार याची तारीख देखील जाहीर केली जात नाहीये.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष होण्यासाठी भास्कर जाधव यांना शुभेच्छा देत त्यांनी निदान निष्पक्ष काम करावं, असं म्हणत खोचक टोला देखील लगावला आहे. या टीकेवर महाविकास आघाडी सरकार तसेच भास्कर जाधव यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

थोडक्यात बातम्या – 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More