Top News

…तर कोरोनाची ही लढाई कदापि जिंकता येणार नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई | महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यावर चांगल्या उपाययोजना झाल्या पाहिजेत. आज या काळात भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर येत आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. भाजपच्या महाराष्ट्र जनसंवाद रॅलीत देवेंद्र फडणवीसांनी याबाबतचं वक्तव्य केलंय.

कोरोनाच्या हाताळणीमध्ये चुका होत आहेत. चाचणी कमी करुन ही लढाई कदापि जिंकता येणार नाही. परिस्थिती काळजीची आहे. मी टीका करत नाही केवळ सूचना करतो आहे. पण सध्या राज्य सरकार कोरोनाशी नाही, आकडेवारीशी लढत आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

आम्ही सरकारला मदत करायला तयार आहोत. पाहिजे ती मदत द्यायला तयार आहोत. पण सरकारलाही या लढाईत ताकदीने उतरावं लागेल, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

मुंबई आणि कोकणातील भाजप कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळात अतिशय मोठे कार्य केले. मला त्यांचा अभिमान आहे, असं देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या-

शरद पवारांच्या त्या टीकेला बाळासाहेब थोरातांचं उत्तर, म्हणाले…

इंधन दरवाढीविरोधात 29 जूनला काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन!

महत्वाच्या बातम्या-

‘कोणाच्या धमकीला घाबरत नाही’; चंद्रकांत पाटलांचं हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

नाना पाटेकरांनी सुशांतच्या पाटण्यातील घरी जाऊन घेतली त्याच्या कुटुंबियांची भेट

पुण्यात आज 328 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या