मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करताना मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेडची जागा बदलण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावरून विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीये.
कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास 4000 कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असं याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितलं. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी?, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केल्याचं सांगत त्यावर उच्च न्यायालयाची स्थगिती होती. काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला. स्थगिती मागे घ्यावी म्हणून विनंती करण्यात आली, तर न्यायालयाने दावे पुढील काळात निकाली निघाले तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
महत्वाच्या बातम्या-
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील राजकारणाची संस्कृती बदलली”
…अन्यथा आपल्याला अनलॉकचा विचार सोडून द्यावा लागेल- राजेश टोपे
चीनच्या पाठिंब्याने पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 लागू करु- फारुख अब्दुल्ला
आपण इंग्रजांना पळवून लावलं, तर कोरोना काय चीज आहे- उद्धव ठाकरे