Top News

“उद्धवजी, राष्ट्रपुरूषांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसबद्दल तुमची भूमिका स्पष्ट करा”

Loading...

मुंबई | काँग्रेसने राष्ट्रपुरूषांना अपमानित करण्याची मालिका सुरू केली आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवाजी महारांजांचा पुतळा तोडला तर काँग्रेसचं मुखपत्रं ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यावीर स्वारकरांना अपमानित करणारा लेख लिहीला आहे. याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सावरकरांचा गौरव राहुद्या पण अपमान तरी करू नका. सावरकरांचा असा अपमान शिवसेना कितपत सहन करणार आहे?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे.

Loading...

छत्रपतींचा अपमान भारत कधीच सहन करणार नाही. मध्य प्रदेश सरकारने देशाची माफी मागावी. तसेच राष्ट्रपुरूषांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसबद्दल उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेची अतूट सेवा केली. मात्र काँग्रेसने सावरकरांवर बलात्कारासारखे आरोप केले आहेत. काँग्रेस हे करत असेल आणि शिवसेना फक्त सत्तेच्या लालसेपोटी हे सहन करत असेल तर याचं उत्तर द्यावं लागेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

‘पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय मुर्खपणाचा’; काँग्रेस नेत्यानंच सरकारला सुनावलं

सरकारला अडचणीत आणणारी वक्तव्य टाळा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

महत्वाच्या बातम्या- 

Loading...

शाळांमधून सावरकरांचे फोटो काढण्याचे राज्य सरकारचे आदेश

‘आमचं उष्ट कोणी खाऊ नये’; गुलाबराव पाटलांचा मनसेला टोला

शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी राजू शेट्टी घेणार पुढाकार!

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या