महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र सरकारला कोरोनाशी नाही कंगणाशी लढायचं आहे- देवेंद्र फडणवीस

मुंबई | कंगणासोबत लढण्यासाठी वापरत आहेत त्यातील 50 टक्के क्षमता जरी सरकारने कोरोनाशी लढण्यासाठी वापरली तर लोकांचे जीव वाचतील, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.

सरकारला असं वाटतंय की कोरोनासोबतची लढाई संपली आहे आणि आता कंगणाशी लढायचं आहे, असा टोला  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

सरकारने दाऊदच्य घरावर कारवाई केली नाही पण अभिनेत्रीच्या घरावर केली, अशी टीकाही देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. फडणवीसांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवरून सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, कंगणाचा मुद्दा भाजपने उचललेला नाही. तुम्ही कशाला कंगणाविरोधात बोलायला सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरावर जाईल इतकं महत्त्व कशाला दिलं?, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

“…तर हा महाराष्ट्र आपल्याला कदापि माफ करणार नाही”

रिया आणि शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले…

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून होणार दंड वसूल- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमु

चीनने भारताची जमीन घेतली याला सुद्धा देवाची करणी म्हणायचं का?- राहुल गांधी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या