महाराष्ट्र मुंबई

“शिवसेनेनं तत्व बाजूला ठेऊन काय काय मॅनेज केलंय हे जाहीर करावं”

Loading...

मुंबई | सरकार बनवताना शिवसेनेनं आपली विचारधारा सोडून काय काय मॅनेज केलंय याची माहिती द्यायला हवी. अशा प्रकारच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणही धोक्यात येऊ शकतं, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला शिवसेनेची सहमती आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. पण बाबासाहेबांच्या घटनेनुसार धर्माच्या नावावर आरक्षण देता येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. इतकंच नाही तर धर्माच्या आधारावर मुस्लिम आरक्षण दिल्याने मराठी आणि ओबीसी आरक्षणही अडचणीत येईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुस्लीम आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने जे मान्य केलं आहे ते लक्षात घेऊन राज्यात लवकरात लवकर मुस्लीम आरक्षण देण्याबाबत अध्यादेश काढून कायदा करु आणि निर्णय घेऊ, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलंय.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

कोरोना व्हायरसमुळे शेअर बाजार गडगडला; दिवसभरात साडेपाच लाख कोटी बुडाले

अमृता खानविलकरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून आई झाली थक्क

महत्वाच्या बातम्या- 

सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा रद्द करा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

“आंबे कसे खाता याऐवजी रात्री शांत झोप कशी लागते हे विचारा”

“तुला बघाया जमंल गर्दी लांब, सविता भाभी तू इथंच थांब!”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या