बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज वो हुए मशहूर जो काबिल न थे…- देवेंद्र फडणवीस

मुंबई | हे सरकार जनतेने निवडून दिलेलं नाही, तडजोड करुन सत्तेवर आलेलं सरकार आहे. तसेच आज ओ हुए मशहूर जो काबिल न थे, और मंजिले मिली उनको जो दौड में शामिल ना थे…, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

भाजपने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी बोलताना फडणवीसांनी शायरी म्हणत उद्धव ठाकरेंना चिमटे काढले आहे.

आमच्या विश्वासघाताची आम्हाला चिंता नाही, आम्ही लढणारे आहोत, पुन्हा मैदानात जाऊन राज्य परत मिळवू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हे सरकार सत्तेत आल्यापासून विश्वासघाताची मालिका सुरूच आहे. बांधावर जाऊन 25 हजार हेक्टरी मदतीची घोषणा कुणाची होती? सांगा उद्धवजी, असा सवालही फडणवीसांनी केलाय.

ट्रेंडिंग बातम्या- 

…तर शेतकरी कर्जमाफीला 400 महिने लागतील- देवेंद्र फडणवीस

देशाला अस्वस्थ करणारी ही दृश्यं तुम्ही पाहिली का?

महत्वाच्या बातम्या- 

‘हे सरकार तर गजनीचा बाप’; मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला

शेतकऱ्यांची ‘ती’ पत्रं घेऊन विरोधी पक्ष आज राज्यपालांची भेट घेणार- देवेंद्र फडणवीस

“देवेंद्र फडणवीस आपला ‘गजणी’ झालेला दिसतोय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More