बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी महाराष्ट्रात का आले नाही म्हणता, मग मुख्यमंत्र्यांचा दोनच जिल्ह्यांचा दौरा का?”

देवगड | तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी देवगडमध्ये माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले असा सवाल करता? मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले? इतर जिल्ह्यात का जात नाही?. मुख्यमंत्री केवळ बाता मारत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले? वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?, आम्हीही असाच सवाल करायचा का?, असं फडणवीस म्हणाले.  मला राजकीय बोलायचं नाही. पण मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आहे. केवळ तीन तासांचा दौरा आणि किती किलोमीटरचा दौरा हे मोजून सांगू का?, असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दरम्यान, मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी जहरी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता 

…पण मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही- उद्धव ठाकरे

कोरोनानं खासदाराचं कुटुंब उद्ध्वस्त; वडिलांच्या अकराव्या-बाराव्याला दोन्ही मुलांचाही मृत्यू

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील अभिनेते हेमंत जोशी यांचं कोरोनाने निधन!

पोटात चाकू खूपसून 13 वर्षाच्या मुलाने वडिलांची केली हत्या; कारण ऐकून सगळेच हादरले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More