महाराष्ट्र मुंबई

…मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल- देवेंद्र फडणवीस

Photo Credit- Facebook/ Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांकडून गांभीर्यानं कारवाई होताना दिसत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कदाचित घटनेचं गांभीर्य लक्षात आलेलं नसावं. त्यांनी कदाचित या प्रकरणातल्या ऑडिओ क्लिप ऐकल्या नसाव्यात किंवा नीट माहिती घेतलेली नसावी. त्यांनी ऑडिओ क्लीप नीट ऐकल्या तर त्यांना कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते समजेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पोलिसांकडे ऑडिओ क्लिप आहेत. त्यातला आवाज कोणाचा आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. मात्र पोलिसांनी तो आवाज कोणाचा आहे, ते सांगायला हवं. सत्य लोकांसमोर यायला हवं. पण पोलिसांवर दबाव असल्यानं त्यांच्याकडून सत्य लपवलं जातं आहे, असं फडणवीस म्हणालेत.

या प्रकरणाची चौकशी केली जाईल. चौकशीमध्ये सत्य काय ते समोर येईलच. मात्र, त्याच वेळी मागे झाला तसा कुणाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असेल तर तेही योग्य नाही, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

दरम्यान, परळीची असलेल्या पूजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली. ही घटना महंमदवाडी परिसरातल्या हेवन पार्क सोसायटीत घडली. हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर येत आहे. यानंतर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपने केली आहे.

थोडक्यात बातम्या-

शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला, म्हणाले…

मोदींच्या कुटुंबातील व्यक्तीनं केलेल्या आरोपानं खळबळ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील ‘तो’ मुलगा गायब!

पुण्यातील ‘या’ रस्त्यावर 7 किलोमीटर लांबीचा दुमजली उड्डाणपूल होणार!

अशी ही बनवाबनवी!!! ‘एक्स’ची अंगठी चोरुन केलं ‘नेक्स्ट’ला प्रपोज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या