मुंबई | राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अघोषित आणीबाणीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली.
राज्य सरकारविरोधात बोलणाऱ्याला तुरुंगात टाकले जात असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फडणवीसांच्या या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. राज्यात अघोषित आणीबाणी असेल तर देशात काय घोषित आणीबाणी आहे का?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारलाय.
शेतकऱ्यांशी संवाद साधण्याऐवजी केंद्र सरकार आणि भाजप त्यांना देशद्रोही ठरवत आहे. हा प्रकार आणीबाणीपेक्षा भयंकर आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. याला प्रत्युत्तर देत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.
इथल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या ? महाराष्ट्रात काय दिवे लावले ते बोला, रशिया, अमेरिकेत काय झालं ते बोलता, महाराष्ट्रावर बोलले तर उघडे पडतात, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
थोडक्यात बातम्या-
शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात ‘तुकडे-तुकडे गॅंग’-रविशंकर प्रसाद
‘कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबा पण…’; सुधीन मुनगंटीवार अधिवेशनात आक्रमक
पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे याचं निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
“मोदी सरकारचे धोरण नको तिथं बोलायचं आणि हवं तिथं हाताची घडी तोंडावर बोट ठेवायचं”
विश्वासघात करुन सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारची दादागिरी चालू देणार नाही- गोपीचंद पडळकर