बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला ‘हा’ गंभीर आरोप

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून भारतीय सैनिकांचा अपमान केला असल्याचा आरोपही केला आहे. ते पत्रकारांशी या संदर्भात बोलत होते.

मुख्यमंत्री आपल्या भाषणामध्ये एकदाही महाराष्ट्राच्या मुद्द्यावर आणि प्रश्नावर बोलले नाही. तसेच, शेतकऱ्यांची वीज कापण्यापासून ते कृषी विम्यापर्यंत एकाही मुद्यावर व्यक्त होणं त्यांनी महत्वाचं समजलं नाही. त्यामुळे राज्यातील सामान्य जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याचं विरोधीपक्ष नेत्यांनी बोलून दाखवलं आहे.

‘चीन समोर आला की पळे’ हे मुख्यमंत्र्यांनी सैनिकांवर केलेलं वक्तव्य चुकीचं आणि उणे 30 अंश सेल्सिअस तापमानात देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा अपमान करणारं असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांवर केला आहे. एवढ्या थंडीत आणि उणे तापमानात सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकांनी एक इंच जमीनही चीनच्या वाट्याला जाऊ दिली नाही. मग मुख्यमंत्री असं वक्तव्य कसं काय करू शकतात? असा प्रश्नही या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या हिंदुत्वावर शंका घेणारे मुख्यमंत्री स्वतःच सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत तसेच शर्जिल उस्मानी ज्याने हिंदुना सडका बोलला त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी एक शब्दही काढला नसुन त्याच्यावर बोलण्याची त्यांची हिंमत नाही अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

इंदौरच्या अकोलेकरांच्या सुनेवर ‘या’ फोटोमुळे सोशल मीडियातून होतोय कौतुकाचा वर्षाव

‘संजय राठोड अजुनही मंत्रीपदावरच’; चित्रा वाघ यांचा सरकारवर गंभीर आरोप

“वाटेल तितकं आपटा तुम्ही, वाटेल तितकं बोंबला तुम्हाला उत्तर देणार नाही”

पूजा चव्हाण प्रकरणात नवं वळण; मोबाईल आणि लॅपटाॅप भाजप नेत्यानं चोरला?

मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनाच्या भाषणातील राज्यातील 3 महत्वाचे मुद्दे व प्रश्न सांगा आणि बक्षीस मिळवा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More