बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की, केंद्र सरकारचा हात आहे”

नांदेड | राज्यात सध्या देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देगलूर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत ठाकरे सरकारवर चांगलीच टीकेची तोफ डागली.

मराठवाड्यात आणि एकूणच महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यातच आता प्रचारसभेत भाजपने हाच मुद्दा उचलून धरला आहे. फडणवीसांनी त्यांच्या काळातील नुकसान भरपाई आणि विम्याच्या रकमेची आकडेवारी सांगत हे सरकार फक्त भ्रष्टाचार करत आहे आणि मदत देण्याच्या वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे, असा घणाघात केला आहे.

सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण वेगवेगळ्या मुद्द्यावरून चांगलंच पेटलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात फडणवीसांनी प्रचारसभेत बोलताना असं म्हटलं की, ‘हे सरकार अत्यंत लबाड असून काहीही झालं तरी केंद्र सरकारकडे बो़ट दाखवतं, मला तर असं वाटतं की, बायकोने मारलं तरी सांगतील की केंद्राचा हात आहे’, त्यामुळे आता याचे राजकीय पडसाद उमटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ठाकरे सरकारमध्ये लबाड लोक असल्याची टीका फडणवीसांनी केल्याने आता महाविकास आघाडीकडून त्यांना कसं प्रत्युत्तर मिळणार?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

“मोदी सरकारनं लसीकरणाची शंभरी साजरी केली, आता इंधन दरवाढीचीही शंभरी साजरी करावी”

नवनीत राणांनी साजरी केली करवाचौथ! खास फोटोज सोशल मीडियावर व्हायरल

“शाहरुख खान सर तुम्ही भारत सोडून कुटूंबासोबत पाकिस्तानात येऊन स्थिर व्हा.”

भारत कालची मॅच हरल्यानंतर पंजाबमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

परिक्षेत विद्यार्थ्याने लिहिलं असं काही की, वाचून शिक्षक गेले कोमात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More