नागपूर | भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून दहा बालकांचा आगीत होरपळून मृत्यु झाला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रगतीशील महाराष्ट्रात दहा नवजात बालकांचा मृत्यू आयसीयूमध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही. मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखाची मदत द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातील ही काळी घटना आहे. फायर ऑडिट का झाले नाही? याची चौकशी व्हावी. यावर राजकारण करायचं नाही मात्र ज्यापद्धतीने दावे केले जात आहेत. त्यात अर्थ नसून ते चुकीचं असल्याचं फडणवीस म्हणाले .
दरम्यान, या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यातील सात बालकांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेने संपुर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
Bhandara incident is very tragic and painful.
We demand high level probe!
Reached Nagpur and about to reach Bhandara.https://t.co/53fm4dvmnz pic.twitter.com/bGNnS04kyE— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 9, 2021
थोडक्यात बातम्या-
मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी; 6 दिवसांपासून ‘या’ गोष्टीची गुणवत्ता घसरली
राज्य सरकार हम चलायेंगे, मलाई भी हम खायेंगे, असं चालणार नाही- प्रसाद ला
‘हे घडायलाच नको होतं…’ भंडाऱ्याच्या घटनेवर मंत्री अमित देशमुख यांचं ट्विट
भंडाऱ्याच्या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा- प्रवीण दरेकर
ऐकून विश्वास बसणार नाही, मात्र 33 वर्षे फक्त चहा पिऊन जगतायत पल्लवीदेवी!