शरद पवारांना मोठा धक्का; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला हा निर्णय

शरद पवारांना मोठा धक्का; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला हा निर्णय

मुंबई | निरा देवघर धरणातील बारामतीला जाणारं बेकायदेशीर पाणी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

जलसंपदा विभागाने आज मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत याबाबत आदेश काढला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फटका बारामतीशेजारील तालुक्यांनाही बसणार असल्याचं बोललं जात आहे.

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नानंतर आता निरा डाव्या कालव्याचं पाणी फलटण आणि माळशिरस या तालुक्याला जाणार आहे.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बारामतीचं पाणी बंद करून भाजप सरकारने पवारांना मोठा धक्का दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

-राज ठाकरेंच्या भेटीवर अमोल कोल्हे म्हणतात…

-सर्व संघांची डोकेदुखी ठरलेल्या ‘एलईडी बेल्स’ बदलणार का???, आयसीसी म्हणते…

-Google ला मागे टाकत जगात ‘ही’ कंपनी ठरली अव्वल

-फेसबुकवर दिवसाला ३ लाख रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी

-मी असेपर्यंत अमेरिकेला कोणी मूर्ख बनवू शकत नाही; डोनाल्‍ड ट्रम्प भारतावर चिडले

Google+ Linkedin