बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांना वाटते ‘या’ गोष्टीची भीती, स्वत:च केला खुलासा

पुणे | राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. विधानसभेत सत्ताधाऱ्यांना त्यांनी अनेकदा कोंडीत देखील पकडलं आहे. तसेच त्यांच्या रोखठोक आणि अभ्यासात्मक उत्तरांसाठी त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. अशातच देवेंद्र फडणवीसांना कोणत्या गोष्टीची भीती वाटते हे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं आहे. (Devendra Fadnavis fears inauguration of cemetery)

लोणावळ्यातील एका स्मशानभूमीचं उद्घाटन करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना निमंत्रित करण्यात आलं होतं. त्यांच्या हस्ते स्मशानभूमीचं उद्घाटन पार देखील पडलं. त्यावेळी त्यांनी मला स्मशानभूमीचं उद्घाटन करण्याची भीती वाटते असं फडणवीस म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी स्मशानभूमीचं उद्घाटनाचा जुना किस्सा देखील सांगितला आहे.

मी नागपूरचा महापौर (Mayor) असताना, तेव्हाच्या विरोधीपक्ष नेत्यांच्या वॉर्डात गेलो होतो. त्यावेळी तिथं स्मशानभूमीच्या उद्घाटनावेळी त्यांनी मला पहिलं लाकूड मला ठेवायला लावलं, मग इतरांनी सरण रचलं. त्यानंतर टेम्भा हातात देऊन अग्नी ही द्यायला लावला, असा किस्सा फडणवीसांनी सांगितला आहे. त्यानंतर सर्वत्र एकच हशा पिकलेला पहायला मिळाला.

दरम्यान, सुदैवाने त्या उद्घाटनासारखं तुम्ही काही केलं नाही, हे मी माझं नशीब समजतो, असंही फडणवीस यावेळी म्हणाले. त्यावेळी कार्यकर्ते देखील हसून हसून लोटपोट झाल्याचं पहायला मिळालं.

थोडक्यात बातम्या-

बिबट्या थेट वर्गात शिरला अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!

अबब… लाखाचे केले 72 लाख!; ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई

परमबीर सिंहांनी पुन्हा ठाकरे सरकारविरोधात दंड थोपटले, हे मोठं पाऊल उचलणार!

भर कार्यक्रमात कन्हैय्या कुमार आणि राम कदम यांच्यात शाब्दिक चकमक; पाहा व्हिडीओ

“रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही”; शिवप्रेमींचा आक्रमक पवित्रा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More