देवेंद्र फडणवीसांनी महिलांना दिली मोठी गुड न्यूज!

Majhi Ladki Bahin Yojana | राज्य सरकारने महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (Majhi Ladki Bahin Yojana) योजना सुरू केली आहे.  जुलै महिन्यापासून महिलांनी अर्ज भरले आहेत. यानंतर आता हळूहळू तीन हजार रुपयांची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली जात आहे.

एकीकडे या योजनेला राज्य भरातून प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे विरोधक यावर टीका करताना दिसत आहेत. लाडकी बहीण योजना जास्त दिवस सुरू राहणार नाही, असं विरोधक म्हणत आहेत. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी महिलांना मोठी गुड न्यूज दिलीये.

देवेंद्र फडणवीसांनी दिली गुड न्यूज

सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाणार. दर महिन्याला आणि वर्षानुवर्षे महिलांच्या बँक खात्यात पैसे जाणार. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत ही योजना कुणीच बंद करु शकत नाही, अशी महत्त्वाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये.

“1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले”

आपण लाडकी बहीण योजना जेव्हा घोषित केली तेव्हा विरोधक म्हणायचे, फसवी योजना आहे. 10 टक्के महिलांनाही पैसे मिळणार नाही. मला सांगताना आनंद होतोय, पहिल्यात महिन्यात 1 कोटी पेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात पैसे पोहोचले आणि उर्वरित सगळ्या महिलांच्या खात्यात पैसे जाणार, एकही बहीण वंचित राहू देणार नाही, असं फडणवीस म्हणालेत.

आमच्या बहिणींचं प्रेम मिळतंच, आमचा प्रयत्न आहे, त्या बहिणींना आम्ही ओवाळणी द्यावी तरी त्या प्रेमामध्येच राहायचं आहे. जे लोकं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले त्यांना 1500 रुपयांचा मोल समजणार नाही. माझी जी मायमाऊली महिन्याचा हिशोब करताकरता तिच्या डोळ्यांतून पाणी येते त्या मायमाऊलीसाठी ही योजना आणली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला मोठा धक्का बसणार; ‘या’ नेत्याने प्रोफाईलवरून हटवलं कमळ

मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा, मराठा आरक्षणानंतर आता…

तज्ज्ञांचा पालकांना अत्यंत महत्त्वाचा सल्ला; मुलांना ‘या’ गोष्टी नक्की शिकवा

मोठी बातमी! भाजपच्या विद्यमान आमदारांचं भविष्य धोक्यात?

ऐश्वर्या-अभिषेकचं लग्न थांबवण्यासाठी जान्हवी कपूरने कापली होती नस; मोठा खुलासा समोर