बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांनीच मराठा समाजाचा घात केलाय- नाना पटोले

मुंबई | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असताना मराठा समाजाला दिलेलं आरक्षण ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूक होती. असा आरोप काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी केला आहे. 102 वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर राज्यांना आरक्षणाची संबंधित कोणते अधिकारच राहिलेले नसताना फडणवीसांनी मराठा समाजाला दिलेलं आरक्षण ही केवळ मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.

केंद्र सरकारने 102 वी घटना दुरुस्ती केल्यानंतर राज्यांना आरक्षणाची संबंधित कोणतेच अधिकार राहिले नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान सांगितलं आहे. त्यामुळे मराठा समाजाचा घात देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं उघड झाल्याचं नाना पटोले यांनी बोलून दाखवलं. तसेच पुढे बोलत असताना काँग्रेस पक्ष हा कायम मराठा आरक्षणासाठी आग्रही आहे आणि त्यासाठी होईल ती मदत आणि प्रयत्न काँग्रेस पक्ष नेहमीच करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सरकारने देशातील मोठे वकील लावून हे प्रकरण मार्गी लावावे. असा आग्रहही काँग्रेस पक्षाचा असल्याचं पटोले यांनी सांगितलं. तसेच मराठा समाजाला आता फडणवीसांनी केंद्राला सांगून आरक्षण मिळवून द्यावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना आरक्षणच संपुष्टात आणायचं असल्याने हा सगळा घाट घातला असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय. तसेच, “मराठा आरक्षणाचा गुंता भाजपने वाढवला असल्याचं 8 मार्चच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीतून उघड होतंय” असे टीकास्त्रही त्यांनी भाजपवर सोडले.

थोडक्यात बातम्या –

‘मेल्यावर साहेबांना काय सांगू?’; ‘या’ शिवसेना नेत्याचा उद्धव ठाकरेंना सवाल

“…तर महाराष्ट्राची जनता काय आदर्श घेणार?, विरोधकांनी विचार करायला हवा”

राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारीही देखील अत्यंत धक्कादायक

मनसुख हिरेन यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकला- देवेंद्र फडणवीस

पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More