बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महाविकास आघाडी सरकार हरवलंय, शोधून देणाऱ्यास…”

मुंबई | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार सर्व सामान्यांचं राहिलेलं नाही. हे सरकार काम करताना दिसत नाहीये. हे सरकारच हरवलं आहे. शोधून देणाऱ्यास पुरस्कार देऊ, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लाखणीमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्यावर सभेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी ही टीका केली आहे. या सरकारला तुम्हीच खाली आणू शकता, असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

मी मुख्यमंत्री असताना धनाचा बोनस देण्याची सुरूवात केली होती. आमच्या सरकारच्या काळात आम्ही सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घोषणा करायचो. पण या महाविकास आघाडी सरकारने हा बोनसच बंद केला आहे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही एकाही शेतकऱ्याची वीज कापली नाही. मात्र या सरकारच्या काळात दररोज वीज कापली जात आहे, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान, या आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण रद्द करण्याचं पाप केलं आहे. यांना मराठा आरक्षण देखील देता आलं नाही. ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द केल्याने आता ओबीसींचं राजकीय प्रतिनिधीत्व आता धोक्यात आलंय, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“मी हरलो तर राजकारण सोडेन”, नवज्योतसिंह सिद्धूंचं खुलं आव्हान

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर राष्ट्रवादीनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

अन् रुपाली ठोंबरे म्हणाल्या ‘…हेच आहेत पवार साहेबांचे संस्कार’

अजितदादांचा दिलदारपणा! एका मिनिटात केली अमित शहांच्या मुक्कामाची सोय

सोनं-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महाग, वाचा आजचे ताजे दर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More