बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सरकारच्या निर्मात्यांना सरकारची बाजू घ्यावीच लागते- देवेंद्र फडणवीस

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर धक्कादायक आरोप केलेले पत्र लिहिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली. या सर्व प्रकरणात नुकतीच शरद पवार यांची पत्रकार परिषद दिल्ली येथील निवासस्थानी पार पडली. त्यानंतर लगेचच महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेतली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. पवारांची पत्रकार परिषद ऐकून आश्चर्य वाटलं असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. कारण, शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे निर्माते आहेत आणि निर्मात्यांना सरकारची बाजू घ्यावीच लागते. त्यामुळे त्यांची बाजू योग्यच आहे. असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री हे सचिन वाझेला परत कामावर रुजू करून घेत असताना झोपले होते का? त्यांना याबद्दल काही माहितीच नव्हती का? असा प्रश्न फडणवीस यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला.

अशाप्रकारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे तसेच  गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

लग्न झालेल्या पुरुषाच्या प्रेमात पडू नका; स्वत: ठोकर खाल्लेल्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

सचिन वाझेंना पुन्हा पोलीस दलात घेण्याचा निर्णय कोणाचा? शरद पवारांचा गौप्यस्फोट

‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, मित्राला वाचवण्यासाठी दाखवली जबरदस्त हिंमत, पाहा व्हिडिओ

अनिल देशमुखांवर झालेल्या गंभीर आरोपांवर बाळासाहेब थोरातांनी सोडलं मौन, म्हणतात…

‘ये तो सोची समझी चाल’; ठाकरे सरकारमधील मंत्र्याची भाजपवर टीका

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More