बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीस दबंग नेते, ते 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात- चंद्रकांत पाटील

पुणे | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावत असताना चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं आहे. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

आमचे नेते देवेंद्रजी दबंग नेते आहेत. ते 100 अजित पवार खिश्यात घेऊन फिरतात. देवेंद्रजी उद्धव ठाकरे यांच्यासारखे नाहीत. त्यांना काहीही माहिती नसतं काय चालू आहे आणि नंतर म्हणतात मला काही माहिती नाही काय चालू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या वयावर जाऊ नका. त्यांनी पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केला आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

पाच वर्षाचा कार्यकाळ पुर्ण करणं सोपी गोष्ट नाही. खूप वर्षानंतर ही गोष्ट झाली आहे. शिवसेनेने आम्हाला तेव्हा देखील खुप त्रास दिला. तेव्हा देखील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राज्यात सरकार स्थापन करायचा प्रयत्न केला होता, असंही चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावरही पाटलांनी उत्तर दिलं आहे. हसन मुश्रीफ हे ड्रामा करत आहेत. मी त्यांना कसलीही ऑफर दिली नाही. माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

मुश्रीफ म्हणाले, ‘दादांकडून भाजप प्रवेशाची ऑफर’, आता चंद्रकांत पाटील म्हणतात….

“शरद पवारांचं नाव घेण्याची त्यांची लायकी आहे का?”

“शिवसेना आणि आमचं फेव्हिकॉलचं नातं, दिवार तुटणार नाही”

कर बुडवल्याच्या आरोपावर सोनू सूदची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

“कायद्याची लढाई कायद्यानं लढा कोल्हापूरी चपलेनं लढू नका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More