देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री- नवनीत राणा

अमरावती | देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, असं वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. अमरावती येथील सभेत त्या बोलत होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत आणि आमचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या राज्यामध्ये. राज्यातून गोवा, गोव्यातून गुजरात. जिथं जिथं देवेंद्र फडणवीस यांचं पाऊल पडलं, तिथ तिथं न्यायासाठी लढणारा व्यक्ती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे, असं नवनीत राणा म्हणाल्यात.

देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, असं नवनीत राणा म्हणाल्या. यावेळी सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित होते.

दरम्यान, नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भाजपमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असं म्हणत बावनकुळेंनी राणा दाम्पत्याला ऑफर दिली.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More