आताची सर्वात मोठी बातमी, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री…

Bachchu Kadu

Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी माहिती समोर आलीये. येत्या दोन दिवसात याची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर नाराज एकनाथ शिंदेंची समजूतही काढण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. नवं सरकार स्थापन होईपर्यंत आणि नव्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेईपर्यंत ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री राहणार आहेत.

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री

फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाला भाजपच्या सर्व आमदारांचा पाठिंबा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं जाणार आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं जाणार आहे. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गृह मंत्रालय राहणार आहे.

दोन दिवसांच्या चर्चेनंतर आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न सुटला असून देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नावावर दिल्लीतील नेत्यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री असतील अशीही माहिती आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नावाला दिल्लीतून पसंती मिळाल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदेंची ही नाराजी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून दूर केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘शिंदेंसोबत तसं काहीही ठरलं नव्हतं’, दिल्लीतील नेत्याने सगळं सांगूनच टाकलं

फडणवीसांना नाहीतर ‘या’ महिला नेत्याला मुख्यमंत्री करा! कोणी केली मागणी

‘सेक्स लाईफमुळे बाॅलिवूडमध्ये…’; वकीलांनी दिलेल्या माहितीमुळे खळबळ

पराभव जिव्हारी लागला; ‘या’ बड्या नेत्याची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली! कधी होणार? 

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .