बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवार सपोर्ट करत नाहीत, पण बडे साहब सब देख रहे है”

मुंबई | यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजत आहे. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अधिवेशन तहकुब देखील करावं लागलं आहे. त्यातच मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्य सरकारकडून विरोधकांना संपवण्याच षडयंत्र आखलं जात आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. यावेळी तब्बल सवाशे तासाचं रेकॉर्डिंग असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

महाराष्ट्राची पोलिस व्यवस्था अतिशय प्रगल्भ आहे. मी पाच वर्षे राज्याचा गृहमंत्री म्हणून काम केलं आहे. महाराष्ट्राची पोलिस व्यवस्था अतिशय प्रगल्भ आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून पोलीस दलाचा मोठा गैरवापर केला जात आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांकडे एक पेनड्राईव्ह दिला आहे. कशा प्रकारची कटकारस्थान शिजवली जात आहेत, याविषयी पुरावे दिले आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

कथा इतकी सुरस आहे की, यातून 20 ते 25 वेबसिरीज तयार होतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एका व्हिडीओतील संवाद वाचून दाखवला आहे. अजित पवार सपोर्ट करत नाहीत. पण बडे साहब सब देख लेते है, कोणी चांगले अधिकारी आहेत काय?, चार पाच अधिकाऱ्यांची नावं द्या असं मला सांगितलं. त्यांनाच आपण अपॉईंट करू आणि त्या माध्यमातून सर्व कारवाई करू, असे विशेष सरकारी वकील सांगत आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

दरम्यान, सुरेश जैन, रमेश कदम, महेश  मोतेवार, अशा सगळया केसेसमध्ये सरकारी वकील प्रवीण पंडीत चव्हाण, अशी नावे देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहेत. प्रत्येक गोष्टीचा व्हिडीओ मी अध्यक्षांकडे दिला आहे आणि मंत्रिमहोदय आपल्याकडेही देतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यावेळी अनेक गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी वाचून दाखवल्या आहेत.

थोडक्यात बातम्या – 

राऊतांनी आरोप केलेले जितेंद्र नवलानी आहेत तरी कोण?, वाचा काय काय म्हणाले राऊत…

Wheather Update: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा

भाजपचं टेन्शन वाढलं! प्रियंका गांधींबाबत काँग्रेस लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

“माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी लवकरच जेलमध्ये जाणार”

‘किरीट सोमय्या हे ईडीचे पाचवे वसुली एजंट’; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More