देवेंद्र फडणवीस सलग सहाव्यांदा विजयी होणार का?

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis l विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. अशातच सर्वात महत्वाची मानल्या जाणाऱ्या या विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जात आहे. अशातच या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे कसं मैदान मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

फडणवीस सहाव्यांदा विजयाचा गुलाल उधळणार का? :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. यापूर्वी फडणवीस हे सलग पाचवेळा विधानसभा निवडणूक जिंकले आहेत. तर आता देवेंद्र फडणवीस हे सहाव्यांदा विजयाचा गुलाल उधळणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

मात्र यावेळेस देवेंद्र फडणवीसांसाठी हा सामना खूप सोपा असला तरी विधानसभा निवडणुकीची मॅच जिंकण्याचं आव्हान मात्र त्यांच्यासमोर असणार आहे. कारण राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे विजयी षटकार ठोकून निवडणुकीचा सामना जिंकणार का? याबाबत सर्वांनाच प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

Devendra Fadnavis l फडणवीसांनी उमेदवारी अर्ज केला दाखल :

याशिवाय देवेंद्र फडणवीस हे आमदारकीचा षटकार ठोकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 अशा सलग पाच वेळा बाजी मारली आहे. मात्र आता सहाव्यांदा देखील सहज विजय मिळवू असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर मधील उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी निघालेल्या रॅलीत देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असणार अशा आशयाच्या घोषणा देखील त्यांनी दिल्या आहेत. तसेच यावेळी मात्र मुख्यमंत्रीपद पक्कं असल्याचा विश्वास फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना आहे.

News Title – Devendra Fadnavis Maharashtra Assembly Elections 2024 

महत्त्वाच्या बातम्या-

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 23 जणांना मिळालं विधानसभेचं तिकीट

मनसेने चौथी यादी केली जाहीर! पाहा कोणाला मिळाली उमेदवारी?

शिंदे गटातील ‘या’ आमदाराची संपत्ती 5 वर्षात दहापटीने वाढली!

न्यायाधीशाला मॅनेज केल्याचा भुजबळांवर आरोप; कोणी केला आरोप?

दिवाळीतही धो-धो बरसणार?, हवामान विभागाने दिला महत्वाचा इशारा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .