देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर महिलेकडून धक्कादायक प्रकार, सगळीकडे एकच खळबळ!

Devendra Fadnavis | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मुलाखती व त्यातून त्यांनी मांडलेल्या राजकीय भूमिकांविषयी चर्चेचा विषय ठरत आहेत. आता फडणवीस यांच्या कार्यालयातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचा गाडा हाकला जाणाऱ्या मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर एक महिलेने चक्क तोडफोड करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे.

काय आहे प्रकरण?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर कार्यालय आहे. दरम्यान, एका अज्ञात महिलेनं मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयात नासधूस करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर फडणवीस यांच्या कार्यालयात तोडफोडीचा देखील प्रयत्न झाला आहे. त्यामुळे सध्या मंत्रालयाच्या सुरक्षेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

महिलेनं काय केलं?

समोर आलेल्या माहितीनूसार, एक अज्ञात महिलेने फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कार्यालयाबाहेरची नावाची पाटी काढून फेकून दिली. त्यानंतर कार्यालयात घुसून आरडाओरडा केला. तिथे असलेल्या कुंड्या फेकल्या. गोंधळ घातला. त्यानंतर तिथून पसार झाली. सोशल मीडियावर घडलेल्या प्रकाराचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत. मात्र, ही महिला कोण आहे? याबद्दल पोलिस तपास करत आहेत.

सुरक्षितेवर प्रश्न-

या घडलेल्या प्रकारानंतर सध्या मंत्रालय सुरक्षित नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, सध्या या महिलेचा शोध सुरु झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. येत्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे सध्या निवडणुकीच्या तयारीमध्ये, राजकीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात. मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात हा प्रकार घडला, त्यावेळी देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित होते की नाही? हे समजू शकलेलं नाही.

News Title : Devendra fadnavis mantralay office woman try to destroy cabin

महत्त्वाच्या बातम्या-

कॉँग्रेसचा निष्ठावंत नेता हरपला, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं निधन

उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड!

शेतकऱ्यांनो PM किसान योजनेचा 18 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार!

…तर या मुद्द्यावरून पुण्याचं राजकारण तापलं! विरोधी पक्षाने दिला ‘हा’ इशारा

अबब! सोनं पोहोचलं 80 हजारांवर?, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड