Devendra Fadnavis | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार, याबबात उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मात्र, आता या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं दिसतंय. काल (28 नोव्हेंबर) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत आणि मंत्रीपदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. (Devendra Fadnavis)
याच बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचे समजते. काही मीडिया रिपोर्टमध्ये याबद्दल दावा करण्यात आला आहे. मात्र, महायुतीकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होऊ शकतात.
दिल्लीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?
अर्थातच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा पॅटर्न पुन्हा एकदा चालू शकतो. गुरुवारी रात्री महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. या बैठकीतच या समीकरणावर शिक्कामोर्तब झाल्याचं म्हटलं जातंय. (Devendra Fadnavis)
एकनाथ शिंदे यांनी अगोदरच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं म्हटलं आहे. शिवाय अजित पवार गटाने देखील महायुतीत मुख्यमंत्री पदाबाबत ज्याचे नाव ठरवले जाईल त्याला अगोदरच ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार, याची आता जोरदार चर्चा आहे.
‘त्या’ फोटोंची जोरदार चर्चा
दरम्यान, दिल्लीतील बैठकीचे फोटो देखील सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्य दिसून आलं. अपवाद होता तो एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याचा. फोटोमध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याचं दिसून आलं. शिवाय एकाही फोटोत ते हसले नाहीत.फोटोमधील त्यांची बॉडी लँग्वेज वेगळ्याच चर्चेला वाट करून देत आहे.
एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, काल दिल्लीत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांचा पडलेला चेहरा काहीतरी वेगळंच सांगून जातोय. या फोटोंची आता जोरदार चर्चा रंगत आहे. (Devendra Fadnavis)
News Title : Devendra Fadnavis may become CM of Maharashtra
महत्वाच्या बातम्या –
CM पदाच्या बदल्यात शिंदेंना हवीत ‘ही’ मोठी खाती?, अजितदादांच्या वाट्याला काय येणार?
फडणविसांच्या चेहऱ्यावर फूललेलं हास्य अन् शिंदेंचा पडलेला चेहरा..’त्या’ फोटोंची जोरदार चर्चा
आज मासिक शिवरात्री, भोलेनाथ ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!
मोठी बातमी समोर! ‘या’ खात्यावरून भाजप आणि शिंदे गटात वाद?
मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्यानंतर एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार, आता…