बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट; भेटीनंतर म्हणाले…

नवी दिल्ली | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्ली पोहोचताच देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री झालेल्या नारायण राणे, डॉ. भागवत कराड, कपिल पाटील, रावसाहेब पाटील दानवे आणि डाॅ भारती पवार यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. फडणवीस आणि शहा भेटीनंतर आता राजकिय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे.

सहकार मंत्रालय स्थापन झाल्यापासून नंतर पहिल्यांदाच अमित शहा यांची देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. देशाचे पहिले सहकार मंत्री झाल्यानं फडणवीसांनी अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या दोन तासांच्या बैठकीत राज्यातील सहकार क्षेत्रातील गैरव्यवहारावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा तसेच आगमी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे.

अमित शहा यांची भेट घेऊन फडणवीस नागपूरात दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांनी राजकीय अर्थ काढू नये, असं सांगितलं. तसेच केंद्रात नवीन मंत्री झाले आहेत. त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या, असंही त्यांनी सांगितलं आहे. आगामी काळात मनसे सोबतच्या युतीवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. योग्य वेळी निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, अमित शहा यांच्या भेटीत मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाचा अधिकार हा राज्यालाच आहे. केंद्राला नाही, असं फडणवीस यांनी बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यावर आता राजकिय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘रात्री कुणालाही अटक होऊ शकते’; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं खळबळ

भाजप-मनसे युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

‘झोटिंग कमिशनचा अहवाल सरकारपर्यंत आलाच नाही’; अजित पवारांचा मोठा खुलासा

सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप, ते सांगतील तो सल्ला ऐकण्यास तयार- सुभाष देशमुख

…त्यामुळे शरद पवारांना बळीचा बकरा बनवू नका- रामदास आठवले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More