Top News महाराष्ट्र

‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘; देवेंद्र फडणवीस यांचं आणखी एक पुस्तक प्रकाशित

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं आणखी एक पुस्तक प्रकाशित झालं आहे. ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘ असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून राज्य सरकारला मिळालेल्या निधीचा लेखाजोखा मांडला आहे.

हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्याची माहिती देताना फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘ हे नवीन पुस्तक वाचकांपुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. मराठी/हिंदी/इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या काळात देशातील गरीब, वंचितांपासून ते उद्योगांपर्यंत सर्वांना मदत करण्यासाठी आत्मनिर्भर अभियान जाहीर केलं. हे अभियान नेमकं काय, या पॅकेजमधून कोण आणि कसा लाभान्वित होणार, महाराष्ट्राला या पॅकेजमधून काय मिळणार याचं अतिशय सोप्या शब्दात त्यांनी या पुस्तकात विश्लेषण केलं आहे.

या पुस्तक प्रकाशनादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, संघटन मंत्री विजय पुराणिक यावेळी उपस्थित होते.

ट्रेंडिंग बातम्या-

BSNL चा नवा ‘वर्क फ्रॉम होम’ प्लॅन; दररोज मिळणार 5 जीबी डेटा

पंकजा मुंडे यांना केंद्रात ‘हे’ पद मिळण्याची शक्यता!

महत्वाच्या बातम्या-

‘आत्मनिर्भर’च्या नावाखाली भाजपकडून कोकणवासियांची दिशाभूल- अनिल परब

वाट्टेल ती किंमत मोजून ठाकरे सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्यात, पण …- संजय राऊत

कोरोना संशयित रूग्णाचा मृतदेह तब्बल ३ तास एसटी आगारात पडला, लाजीरवाणं कृत्य…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या