Loksabha Election l महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता भाजपने विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरु केली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. लोकसभेतील अपयश हे सामूहिक आहे. त्या अपयशाला ‘एक अकेला देवेंद्र’ जबाबदार नाही, असं केंद्रीय नेतृत्वाचं स्पष्टीकरण दिल आहे.
लोकसभेतील अपयशाची जबाबदारी सामुदायिक :
यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत जे झाले आहे तो आता भूतकाळ आहे. लोकसभेतील अपयशाची जबाबदारी ही सामुदायिक आहे. त्यासाठी एकट्या देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरण्यात काहीही अर्थ नाही’ असे सांगत भाजप केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
मात्र, आगामी विधानसभा निवडणुका एकत्रितपणे लढवताना महायुतीच्या नेत्यांबरोबरच पक्षातील नेत्यांशी देखील संवाद ठेवावा. कारण सारे काही मीच करणार अशी भूमिका न घेता पक्षाच्या नेत्यांमध्ये जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण करा असे सांगत केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांचे देखील कान टोचले आहेत.
Loksabha Election l लोकसभेतील पराभवाची झाडाझडती सुरु :
दिल्लीमध्ये विधानसभेसाठी राज्य सुकाणू समितीची बैठक पार पडली. यादरम्यान पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत लोकसभेतील पराभवाची झाडाझडती घेतली पाहिजे. पण, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला मतदारांनी जो कौल दिला तो आता भूतकाळ झाला आहे.
आता आगामी विधानसभा जिंकण्याचे आपले लक्ष्य असायला हवे आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढवल्या जातील, हे पक्षनेतृत्वाने स्पष्ट देखील केले आहे. मात्र, हे करतानातुम्हाला केंद्राकडून संपूर्ण पाठबळ आहे म्हणून, एकला चलो रे, अशी भूमिका घेऊ नका, असे केंद्रीय नेतृत्वाने सांगितले आहे.
News Title – Devendra Fadnavis Not Sole Responsible For Lok Sabha Election 2024
महत्त्वाच्या बातम्या
महागाईचा झटका! पेट्रोल-डिझेलचे दर तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार
पुण्यासह या जिल्ह्यांत पाऊस हजेरी लावणार; यलो अलर्ट जारी
मोदी सरकारने घेतला शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वात मोठा निर्णय!
या राशीच्या व्यक्तींच्या खिशाला कात्री लागणार
कोणी 22 वर्षांचा तरूण तर कोणी घरचा कर्ता, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर 4 समर्थकांनी आयुष्य संपवलं