Top News

पंकजा मुंडेना ऑफर देणाऱ्या खोतकरांना विचारतंय कोण?; फडणवीसांचा टोला

मुंबई | एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलीये. यानंतर भाजपमध्ये पंकजा मुंडेही नाराज असल्याचं समजल्यावर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिलीये.

खोतकरांनी मुंडे यांना दिलेल्या ऑफरवरून मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोतकर यांची खिल्ली उडवलीये. ऑफर देणाऱ्या खोतकरांना कोण विचारतंय असा सणसणीत टोला फडणीवसांनी लागावला.

पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना फडणवीस म्हणाले, “खोतकरांना विचारतंय कोण? ते कसली ऑफर देतात, त्यांची अवस्था काय आहे? खोतकर माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्यासोबत मी काम केलं. मात्र त्यांना विचारतंय कोण?”

खडसेंनी भाजप सोडल्यानंतर पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं असं अर्जुन खोतकर म्हणाले होते. पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर आम्हाला आनंदच होईल असंही खोतकर म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून सीबीआयला महाराष्ट्रात नो एंट्री- अनिल देशमुख

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले…

“बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल”

अजित पवारांना कोरोनाची लक्षणं, क्वारंटाइन होण्याचा घेतला निर्णय!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या