Devendra Fadnavis | मंत्रिमंडळात डावलल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले आहेत. मंत्रीमंडळ विस्तारानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सतत टीका करताना दिसून येत आहेत.
नाराज भुजबळ (Chhagan Bhujbal आता कोणती मोठी भूमिका घेणार याबाबत चर्चा सुरू असतानाच त्यांनी आज (23 डिसेंबर) थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीने आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय. दरम्यान, याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक खुलासा केला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भुजबळ साहेबांनी माध्यमांना आमच्यातल्या चर्चांबद्दल सांगितलं आहे, त्यामुळे मला वेगळी माहिती द्यायची गरज नाहीये. पुढे ते म्हणाले की, भुजबळ साहेब महायुतीचे नेते आहेत, आणि राष्ट्रवादीचे असल्यामुळे त्यांचा तिथे सन्मान आहे. मात्र, आम्हा तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे.
भुजबळांना डावलन्याचा अजित पवारांचा हेतू?
यावेळी छगन भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही?, असा प्रश्न देखील फडणवीसांना विचारण्यात आला. ते म्हणाले की, भुजबळांना अजित पवारांनी मंत्रीमंडाऴात घेतलं नाही. यामागे भुजबळांना डावलन्याचा अजित पवारांचा कोणताच हेतू नव्हता.
एवढंच नाही तर, अजित पवारांनी मला सांगितलं की, आमची इच्छा आहे की, आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष राहीलेला पक्ष आहे. शिवाय आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर भुजबळांसारखा नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे. आम्हाला त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.
News Title : Devendra Fadnavis on chhagan bhujbal
महत्त्वाच्या बातम्या-
सरपंच हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींना ‘या’ तारखेपर्यंत अटक होणार? शिवसेना नेत्यानी दिली माहिती
वाल्मिकी कराडवर 23 गुन्हे, गुन्ह्यांची यादी मुख्यमंत्र्यांकडे देणार; सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक
नाराज भुजबळ थेट भाजपाच्या वाटेवर?, CM फडणवीसांच्या भेटीनंतर चर्चेला उधाण
महसूलमंत्री अॅक्शनमोडमध्ये! वाळू माफीयांचे धाबे दणाणले
ऐन थंडीत पावसाचं सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली; पाहा कुठे-कुठे बरसणार?