Devendra Fadnavis | धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि भाजप (BJP) आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्या भेटीवरून राजकीय वातावरण तापले आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणात सातत्याने आवाज उठवणारे आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यासह अनेकांनी यावर सवाल उपस्थित करत धस यांच्यावर टीका केली आहे. (Devendra Fadnavis)
देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
या प्रकरणावर जळगावमध्ये प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, हा हेतू घेऊन आमदार सुरेश धस काम करत आहेत. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना ही बाब पचत नाही. त्यामुळेच काही लोकांचा पोटशूळ उठला आहे.”
राजकारणात संवाद गरजेचा- फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना सुनावत पुढे म्हटले, “जर कोण कुणाला भेटले यावरून राजकारण केले जाणार असेल, तर लोकशाहीसाठी ते योग्य नाही. लोकशाहीमध्ये संवाद सुरू राहिला पाहिजे. सुरेश धस यांनी या प्रकरणात गंभीर भूमिका घेतलेली आहे, जी सर्वांनी पाहिली आहे. त्यामुळे संवादच तोडून टाकण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे.”
त्यांनी स्पष्ट केले की, “धनंजय मुंडे हे राज्याचे मंत्री आहेत. त्यामुळे जर एखादा आमदार मंत्र्याला भेटला, तर त्याचा फारसा फरक पडत नाही. त्यामुळे अशा भेटींवरून अनावश्यक राजकारण होऊ नये.”
News Title : Devendra Fadnavis on Dhananjay Munde and Suresh Dhas Meeting