वेळ पडली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू- मुख्यमंत्री

ठाणे | वेळ पडली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकासाठी राज्य गहाण ठेवू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आरपीआयच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान हे इतकं मजबूत आहे, ते कोणीही मोडू शकत नाही, तोडू शकत नाही, बदलू शकत नाही, ते कधीही बदलू शकत नाही.

लोकांना खोटं सांगण्याची आवश्यकता नाही. गीता, बायबल आणि कुराणपेक्षा आम्हाला संविधान प्रिय आहे, असं ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, रोज वाद करायला अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत. पण मी हात जोडून विनंती करतो. बाबासाहेबांवर वाद करु नका. बाबासाहेबांमुळे आज राज्याची ही स्थिती आहे. त्यांच्यामुळे हे राज्य पुरोगामी बनलंय, असंही ते म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या-

-नितीश कुमार भाजपची साथ सोडणार; काँग्रेसचा खळबळजनक दावा

-राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या तब्येतीची शिवसेना-भाजपला जास्त काळजी!

-तनुश्रीची बदनामी करणाऱ्यांना लाज वाटली पाहीजे!

-बाळासाहेब ठाकरेंना वाकडं बोलणाऱ्या लंगड्या भास्करचे पाय राऊतांनी चाटले!

-…म्हणून राष्ट्रवादीच्या तीन बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या